सी. एस. टी.
भारतामधे होणाऱ्या सर्वात उंच इमारतीला 'आग' लावायचे काम मी ज्या कंपनीत M.Tech project करत आहे, तिला मिळाले होते, आणि आमच्या कंपनीने जणु काही मी 'आग' लावण्यात expert आहे असे समजुन ते काम माझ्यावर सोपविले होते. आमचा आगी लावायचा उद्योग कुठपर्यंत आला आहे याचे ppt clientla द्यायला मी मुंबईला आमच्या सरांबरोबर आलो होतो. ठरल्याप्रमाणे meeting ३ - ३.१५ ला संपली. चार वाजता मी CST वर आलो.
माझी लातूर साठीची train ८ :५५ ला होती. आता हे ५-६ तास काय करायचे हा माझ्यासमोर प्रश्न होता. मी तिथे असलेल्या एका बेंचवर जाउन बसलो. माझ्या डाव्या हाताला entrance होता, उजव्या बाजुला platform no. 10. डाव्या खुर्चीवर एक गुज्जू आज्जी पॅतिस खात होत्या तर उजव्या खुर्चीवर एक मुलगा झोपला होता.
सकाळी घेतलेला लोकसत्ता वाचायचा राहिला होता. त्यादिवशी चतुरंग मधे सई तांबे यांचा दहशतवादी हल्ल्यानंतर.......हा लेख आला होता. माझ्या '२६/११ ' च्या आठवणी चाळवल्या. (ही सई तांबे, राजीव तांबेंची मुलगी तर नसावी ? तिचा mail ID पण ***copper@**** आहे .... आणि दोघेही लहान मुलांसाठीच काम करतात .....)
आता मला झोप येत होती. समोरचा एका पोलिस लाकडी बंदूक घेउन फिरत होता.अजुन आपल्या पोलिसांकडे लाकडी बंदुकाच का ?......... असा विचार माझ्या मनात आला आणि मी झोपेच्या स्वाधीन झालो .......
........... आणि एकदम एकाचा एक गोंधळ उडाला. पुन्हा एकदा CST वर दहशतवादी हल्ला ..........
दोन दहशतवादी माझ्या समोरचा SBI ATM चा आडोसा घेउन AK-47 ने गोळ्या झाड़त होते. गोंळ्यांचा आवाज, किंचाळ्यांनी CST भरून गेली. सगळे घाबरून खाली झोपले. पोलिस आपल्या लाकडी बंदुकांनी त्यांना प्रत्युत्तर देत होते. पण काय कोण जाणे मी उठलो, मला गप्पा बसवत नव्हते. अंग थरथर कापु लागले, समोरचा एका खुर्चीचे दोन पत्रे पडले होते. मी त्यातला एक उचलून सरळ दहशतवाद्यांकडे भिरकावला. माझा तो आवेश पाहुन आता काही लोकं पण चिडली, दिसेल त्या वस्तु फेकुन मारू लागली. अर्धी भरलेली पाण्याची बाट्ली जास्त लांब जाते हे मला माहिती होतं, म्हणुन मी पाण्याच्या बाटल्या अर्ध्या रिकाम्या करून फेकत होतो. लोकं माझा अनुकरण करत होती. इतक्यात कुठुनशी गोळी आली आणि त्यातल्या एका दशातावाद्याचा वेधा तिने घेतला. आता एकाच उरला होता, घाबरून तो अजुन वेडयासारखा firing करत होता.
आता मला राहवेना , मगाशी माझ्यासमोर खांद्याला बंदुक अड्कवुन जाणारा पोलिस जखमी पडला होता, त्याची बंदुक तिथेच होती. खुर्चीचा पत्रा एका हातात आणि ती बंदुक दुसया हातात घेउन मी सरळ त्या दहशातावाद्यावर चाल करून गेलो.
आता तो entrance कडून पळुन जायच्या तयारीत होता. पाणी फेकुन माऱ्ल्याने तो सटकन उताना पडला .......
......हाच तो क्षण होता. मी तो सावारायच्या आत पत्रा त्याच्या अंगावर भिरकावला आणि बंदुक त्याच्यावर ताणली . इतक्यात ३-४ news OB van एकदम आतमधेच आल्या. २ -३ रिपोर्टर आता आमच्या दिशेने येत होते . आता ते रिपोर्टर ''अभी अभी आपने ५० -१०० लोगोंको मारा , अब आप कैसा महसूस कर रहे हैं ? " असा प्रश्न दहशतवाद्याला विचारणार की काय ?, भारत सरकार पुन्हा एकदा कसाब सारखी याची पण चौकशी करून आपली 'image' बाहेरच्या जगासमोर उभी करणार की काय ?, आणि ऎड. उज्वल निकमांना पुन्हा तेच काम काय ? अशा अनेक विचारांचे बुडबुडे माझ्या मनात उडाले. तेवढ्या वेळात तो सावध झाला , आता तो Ak-47 सांभाळ्नार तेवढयात मी बंदुकीचा चाप ऒढला होता ....... बंदुकीचा जोरात हिसका माझ्या उजव्या खांद्याला लागला.
बंदुकीचा हिसका जोरात लागल्याने मी डावा हात उजव्या खांद्याकडे नेला. खांद्यावर काहीतरी असल्याचं मला जाणवलं.
(****** टिंग टोंग कृपया यात्री गण ध्यान दीजिये .....******** ) मी एकदम खड्बडुन जागा झालो. उजव्या खांद्यावर बाजुचा मुलगा डोकं टेकून झोपला होता.....
(क्रमश:)

Gopya .....sahi lihtos yar.....
ReplyDeleteGood....keep it up...
chan swapanatach fakt baga kara ghadalatar zopu naka
ReplyDeleteshashya kas kay jamat tula awadh changal lihayala
ReplyDeletechangla project challa aahe !!
ReplyDeletekeep it up :)