whistle blowers.....
Whistle blowers ...... सत्येन्द्र दुबे, शंमुघन मंजुनाथ आणि सतीश शेट्टी ही नावे आज स्वतंत्र भारतात भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या बरोबरीनेचा घेतली जावीत. देशाला पोखरत असलेल्या भ्रष्टचाराशी ह्यांनी दोन हात केले आणि परिणामत : त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. सत्येन्द्र दुबे यांनी IIT कानपूर येथून B.Tech civil engineering , Banaras Hindu University मधून M.Tech आणि IES ला पात्र झाल्यानंतर National Highways Authority of India (NHAI) येथे काम करू लागले. तेथे सत्येद्र यांनी पंतप्रधान वाजपेयींच स्वप्न असलेल्या 'सुवर्ण चतुष्कोण' मधे चाललेल्या भ्रष्टचारावर पायबंद घालायचा प्रयत्न केला. अर्थातच त्यांना धमक्या येऊ लागल्या, त्याला सत्येन्द्र यांनी भीख घातली नाही. प्रकल्पामधे चालू असलेल्या भ्रष्टचाराबद्दल त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले. पण ते पत्र चुकीच्या हातामध्ये पडले आणि सत्येन्द्र दुबे ह्यांच्यावर काळ ओढवला. २७ नोव्हेबर २००३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली.... शंमुघन मंजुनाथ यांनी com...