मी आणि माझी साधना ....
परवाच रविवारी cutting करून आलो ....आणि पुन्हा एकदा तिची आठवण आली.... साधना.... माझी साधना.... माझा
'साधना hair cut...!!!'
मी लहान असताना, माझे बाबा मला आणि तनुवाला (माझा भाऊ) कटिंग वाल्याकडे घेउन जायचे आणि 'बारीक़ कटिंग करा, कानावर केस ठेऊ नका' असा सांगुन निघून जायचे.... मग मी आणि तनुवा भेदरून आपला नंबर कधी येतो याची वाट बघत बसायचो....
कटिंग वाल्या काकांना माझ्या काना मधे काय interest होता कोण जाणे ; खुर्चीवर बसल्या बसल्या ते मला म्हणायचे... 'बिलकुल हलायचा नाही, नाहीतर कान कापीन....' एक दोनदा त्यांनी तसा प्रयन्त पण केला होता !! एकदा खुर्चीवर बसलो की कत्त्ल्खान्याताल्या बोकडाची मान कशी कापतात तशी आमची मान इकडून तिकडे हलवून ते कटींग करायचे. सर्वात जास्त मला ह्या गोष्टीचा राग यायचा की, तनुवाची कटिंग ते छान भांग पडता येण्यासारखी सारखी करायचे आणि माझी नेहमीप्रमाणे 'साधना कट' करायचा त्यांचा 'कट' असायचा आणि तो ते पूर्ण पण करायचे. साधना नावाची एक जुनी actress होती, तिचे केस म्हणजे कपालावर एक दिड इंच केस सरल रेषेत कापलेले... ही झाली साधना कट.... मी तर त्या actress ला बघितला पण नव्हता...
मग पुढचे १०-१५ दिवस जोपर्यंत केस वाढत नाहीत, तोपर्यंत तो एक चेष्टेचा विषय असायचा. भरीस भर ह्याच काकांना आमच्या मुंजिला बोलवाला होता आणि त्यांना चांदीची कात्री पण दिली होती. पण पुढचे ४- ५ महीने तरी मी त्यांच्या साधने पासून वाचणार होतो हाच काय तो आनंद !!!
काल-परवा म्हटला जरा पाहु तरी कशी होती 'साधना' म्हणून, गूगल मधे 'sadhana actress' सर्च टाकला... आणि साधना सापडली ...अरे छान तर दिसत होती... मी उगाच बाऊ करायचो...
पण एक नक्की....''The worst mistakes I made in my life are my hair cuts..... :) ''

bhari lihitos ki.......
ReplyDeletecarrier chi vat chuklyasarkhi vatat nahi ka????
शश्या ..सही लिहिला आहेस ...पण @ तुझा कट' आणि 'साधना कट' थोडं ,,,,,,,ह्म्मम्म्म विचार करावा लागेल
ReplyDeleteGopya kharach tu lihal aahes...
ReplyDeleteSahi yar....mast aahe...
धन्यवाद मित्रानो ....!!!!!!!!
ReplyDeleteशश्या,
ReplyDeleteजमतयं मित्रा, मस्त जमतंय लिहायला. तुझ्या डोक्यावर किती केस आहेत हे मी आता आठवायचा प्रयत्न करतोय :D
गंमत सोड, छान लिहितोयस. भावी लेखकाच्या खुणा दिसतायत आणि दोन अत्यंत वेगळे विषय हाताळल्यामुळे लिखाणातील diversification पण दिसतंय. लगे रहो :)
हे शशांक........... मस्तच लिहितोस कि!!! छान..... लिहित राहा... तुझी साधना छान आहे रे??!!!!
ReplyDeleteपण साधना म्हणजे काय सांगू???
'साधना म्हणजे अधिक स्पष्टता, अधिक समझदारी, आणि तदनुरूप जीवन!!'
isnt it??!!!! हा..हा..हा... फार serious लिहिलंय का?????????
पण खरच छान लिहितोस आं..... मी हि विचार करतोय blog काढावाका म्हणून!!!!!!!!!!!!!
लगे राहो भाई..........
Shashya,
ReplyDeletePopat kelas, tuzi sadhana mhanage yekhadi poragi patavalis ase watale, pan thik ahhe
chan lihale aahes....
Mala pan majhe june Kes..sorry divas athavale !!
ReplyDelete